Pages

Friday, March 30, 2012

दंगल...

दंगल



माणसातील पशुवृत्ती जागी होतो,
नि दंगल जन्म घेते.

लंकेप्रमाणे दंगल गाव पेटवते,
प्रेम आणि माणुसकीची जळून राख होते.

दंगलीतून होतो जन्म हिंसाचाराचा
विसर पडतो माणसाला तेव्हा अहिंसेच्या पुजाकाचा.

शांतीचे अपहरण करून माजवते दंगले काहूर,
माणसाला अश्रुसागरात बुडवते दंगल ही क्रूर.

द्वेषाचे डोंगर नि असामंजस्याची दरी तयार होते,
याच संधीच्या प्रतीक्षेतील परकीय शक्ती आक्रमक होते.

पण दंगलीची तरी चूक काय ?
माणसानेच तिला जन्म दिलाय.

निरपराध समाज मात्र वेड्यासारखा
शोधात असतो,

माणसातील पशुवृत्तीवर उपचार करणा-या एका पशु वैद्याला
आणि
तुटलेली मने प्रेमाच्या धाग्यांनी गुंफणाऱ्या एका विणकराला !


:- अनुपम  


First Published in: Newspaper - 'Tarun Bharat' 27th October 2002 edition