Pages

Showing posts with label poem. Show all posts
Showing posts with label poem. Show all posts

Sunday, June 16, 2013

आश्चर्य_वाटतं...!!

आश्चर्य वाटतं भारत देश अजूनही अस्तित्वात आहे...!!!
होय 
आश्चर्य वाटतं तो अजूनही कार्यरत आहे...

प्रत्येक कार्यालयातील प्रत्येक इसमाने लाच घेऊनही,
केंद्रातून येणारे 
प्रत्येक पैकेज प्रत्येकाने ओरबाडूनही,
माझा देश अस्तित्वात आहे ! आश्चर्य वाटतं...!!

'अर्थ'पूर्ण राजकारणात सर्वच भ्रष्टाचारी,
गल्ली ते दिल्ली नसे एकही सदाचारी,
तरीही राजकारभार चालू आहे ! 
आश्चर्य वाटतं...!!

शासकीय रुगणालयात सुईपासून औषधापर्यंत घोटाळा,
कधी औषधांचा तर कधी डॉक्टरांचाच  तुटवडा,
तरीही दवाखाना चालू आहे ! 
आश्चर्य वाटतं...!!

'खलरक्षणाय सदनिग्रहणाय' हा देऊनी नवीन नारा,
अपराध्याला नव्हे सापडेल त्याला चेपू असाच प्रकार सारा
करीत पोलीस ड्युटीवर आहे ! 
आश्चर्य वाटते...!!

देशाच्या तिजोरीवर सर्वांचाच भार,
नि सर्वत्र असूनही अनागोंदी कारभार,

तरीही  माझा देश अस्तित्वात आहे ! आश्चर्य वाटतं...!!

तितक्यात होते पिता-परमेश्वराचे स्मरण,
नि उमजते देशाच्या अस्तित्वाचे कारण,
ईश्वर नामाचा नित्य गजर होतो जेथे,
'तोच' कर्ता-करविता नि संचालक असे तेथे,
शिर नतमस्तक होते,
नि शब्द आठवतात,

इये अध्यात्माचीये नगरी ! 
इये अध्यात्माचीये नगरी !!

: अनुप
Composed on 17th April 2012

Wednesday, April 18, 2012

माझे_स्वप्न



First posted on  "Antarnad Manache"  on 17th April 2012

माझं स्वप्नं

(कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांची मनस्वी माफी मागून )

                              
काल रात्री मला एक स्वप्नं पडल होतं,
एका रात्रीत अवघं जग बदललं होतं.

सर्व राष्ट्र एकजूट होते,
युद्ध - प्रतियुद्ध घडतंच नव्हते. 

मानवता हाच होता एकमेव धर्म,
माणसाची महानता ठरवत होते कर्म.

पृथ्वीवर नव्हता एका ही भ्रष्टाचारी,
अस्तित्वातच नव्हती कोर्ट अन कचेरी.

कुलूपाविना होतं दार,
कारण तेथे नव्हते गुन्हेगार.

स्त्री पुरुष समानतेचा नव्हता वाद,
शुद्ध, सुंदर, प्रेमळ भाषेत होते संवाद.

राष्ट्र प्रगतीचे स्वप्नं पाहत होते नेते,
माणसा - माणसात होते बंधुत्वाचे नाते.

गुन्हे घडतच नव्हते, म्हणून पोलीस खातेच नव्हते,
गुन्हे घडतच नव्हते, म्हणून पोलीस खातेच नव्हते!

माझे हे स्वप्नं स्वप्नंच होते,
सत्य काही नव्हते,
सत्य काही नव्हते....



  

: Anup K

Saturday, April 14, 2012

सतगुरु_से_विनती

सतगुरु से विनती...

 लिखित : श्रीपति सरनाड (कन्नड़ा में मूल लेखन)
अनुवाद : आत्माराम जाजोडीया



     यह देह, यह आत्मा
     चित्त, मन, बुध्दी सभी आप ही के है,
     स्वेच्छा से इनका उपयोग कीजिए |

                         कठपुतली मै प्रभो !
                         सूत्रचालक आप स्वयं
                         ' मै कर्ता ' भावना को पूरी मिटा दीजिए |

     समग्र चैतन्य को
     मुद्रित कर स्वमुद्र से
     इस अस्तित्व को परमलय
दीजिए |

                          सर्वांग मेरे
                          तव प्राणाहुती से
                          दीव्य स्पंदन झंकृत सदैव होते रहें |

     मेरा इन्द्रिय समूह
     डूबे तेरे रंग में
     श्वास उच्छ्वास से परिमल हो तेरी कृपा से |

                           तेरे लिए, तुझ द्वारा, तुझा ही में जीने का
                           हो रहस्य हस्तगत, स्वामी तेरी कृपा से ! 

 
     
यह देह, यह आत्मा
      चित्त, मन, बुध्दी सभी आप ही के है |


:- लिखित : श्रीपति सरनाडजी

Friday, March 30, 2012

दंगल...

दंगल



माणसातील पशुवृत्ती जागी होतो,
नि दंगल जन्म घेते.

लंकेप्रमाणे दंगल गाव पेटवते,
प्रेम आणि माणुसकीची जळून राख होते.

दंगलीतून होतो जन्म हिंसाचाराचा
विसर पडतो माणसाला तेव्हा अहिंसेच्या पुजाकाचा.

शांतीचे अपहरण करून माजवते दंगले काहूर,
माणसाला अश्रुसागरात बुडवते दंगल ही क्रूर.

द्वेषाचे डोंगर नि असामंजस्याची दरी तयार होते,
याच संधीच्या प्रतीक्षेतील परकीय शक्ती आक्रमक होते.

पण दंगलीची तरी चूक काय ?
माणसानेच तिला जन्म दिलाय.

निरपराध समाज मात्र वेड्यासारखा
शोधात असतो,

माणसातील पशुवृत्तीवर उपचार करणा-या एका पशु वैद्याला
आणि
तुटलेली मने प्रेमाच्या धाग्यांनी गुंफणाऱ्या एका विणकराला !


:- अनुपम  


First Published in: Newspaper - 'Tarun Bharat' 27th October 2002 edition